आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त हिंगणघाट शहरासह तालुक्यात हजारो अनुयायांनी त्यांना मानवंदना देऊन अभिवादन केले. हिंगणघाट तालुक्यातील विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आले.
महामानवाला अभिवादन करण्याकरिता सकाळ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांच्या पुतळ्या जवळ अनुयायांनी एकच गर्दी केली होती. यावेळी विविध राजकीय व सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत अभिवादन केले.
6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुःखद महापरिनिर्वाण झाले आणि देशातील तम्माम दलीत, वंचितांचे कैवारी उद्धारक यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे या दुःखद दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रात्री शहरातून कॅण्डल मार्च काढण्यात आले. यावेळी शहरातील बहुतांश परिसरात अनुयायी हातात मेणबत्ती घेऊन या कॅन्डल मार्च मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महात्मा फुले यशोधरा बुद्ध विहार जवळून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या प्रयत्न कॅन्डल मार्च काढण्यात आला. त्यानंतर हजारो नागरिकांनी महामानवांना मानवंदना देण्यात आली व प्रत्येक वार्डातील अनुयायांनी श्रद्धांजली वाहिली डॉ.बाबासाहेब अमर रहे च्या घोषणा दिल्या. त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदनेने महापरिनिर्वाण संपन्न झाला.