मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांचा जन्मोत्सव महोत्सव व 400 वी जयंती येत्या रविवार 8 डिसेंबर 2024 ला मोठ्या उत्साहाने राज्यभरात संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने हिंगणघाट शहरात संताजी महाराज यांची भव्य शोभायात्रा हिंगणघाट शहरातील प्रमुख मार्गाने दिंडी पताका सहित वाजत गाजत मार्ग कृमण करीत हरी ओम मंगल कार्यालय येथे समापण होईल. तरी समाजबांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री संत जगनाडे महाराज यांची पालखी व भव्य शोभायात्रा हनुमान मंदिर, हनुमान वार्ड येथून
सकाळी 10 वाजत निघेल. संत जगनाडे महाराज यांच्या जीवनावर कथा वाचन व काल्याचे किर्तन भागवताचार्य हभप श्री गजानन महाराज कपिले आणि संच यांचे दुपारी तीन वाजता हरीओम सभागृह येथे संपन्न होणार आहे . किर्तन नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व समाजाच्या बंधु भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज उत्सव समिती हिंगणघाट यांनी केले आहे.