मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420741809.
ऑल इंडिया किसान सभेचा नेतृत्वाखाली उद्या, 9 डिसेंबर 2024 रोजी, आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय, अहेरी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य ठिय्या आंदोलन होणार आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
1. धानाला हमीभाव 3500 रुपये: छत्तीसगड राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना धानासाठी हमीभाव म्हणून 3500 रुपये मंजूर करण्यात यावे.
2. धान खरेदी त्वरित सुरू करावी: हेडरी येथे TDC मार्फत धान खरेदी तातडीने सुरू करावी.
3. मागील हंगामातील धान उचल: गर्देवाडा केंद्रातील मागील हंगामातील धान उचल त्वरित करण्यात यावे, अन्यथा यावर्षीच्या धान खरेदीवर परिणाम होईल.
4. धान खरेदीसाठी गोडाऊन मंजूर करणे: हेडरी, गट्टा, गर्देवाडा, वांगेतुरी, मेड्री अशा भागांमध्ये धान खरेदीसाठी गोडाऊन मंजूर करण्यात यावे, जेणेकरून शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
याशिवाय, शेतकऱ्यांच्या अन्य अनेक समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलनात ऑल इंडिया किसान सभेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कॉ. डॉ. महेश कोपुलवार, जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मा. सैनुजी गोटा, अहेरी विधानसभा प्रमुख कॉ. सचिन मोतकुरवार, तालुका अध्यक्ष कॉ. रमेश कवडो, तसेच किसान सभेचे असंख्य कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
शासनाने या मागण्या त्वरित मान्य कराव्यात. मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांचा संघर्ष हा त्यांच्या हक्कासाठी आहे, आणि हा लढा शासनाला समस्या शेतकऱ्यांचा होणाऱ्या अडचणीची जाण करून आपले हक्क, अधिकार, मिळविण्याकरिता निर्णायक ठरेल.
शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करत आणि त्यांच्या पाठीशी उभे राहत, सर्व नागरिकांना या आंदोलनाचे समर्थन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
*ऑल इंडिया किसान सभा*
*अहेरी विधानसभा क्षेत्र*