आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हात कडेठाण येथे बिबट्याच्या आतंक बघायका मिळाला आहे. येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. लताबाई बबन धावडे वय 50 वर्ष असं मयत महिलेचे नाव असून. ही घटना शनिवारी दि.डिसेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता भर दुपारी घडली.
प्राप्त माहितीनुसार, शनिवारी दुपारी 2.00 वाजता 50 वर्षीय मृतक लताबाई धावडे या उसाच्या शेतात काम करीत होत्या. याच सुमारास माग धरून असलेल्या बिबट्याने लताबाई यांच्यावर हल्ला करत ऊसाच्या शेतात घेवून गेला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतक लताबाई धावडे यांच्या मागे पती, विवाहित मुलगा विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे.
शेतात बिबट्याने महिलेवर हल्ला करत जीव घेतल्याची घटना कडेठाण गावामध्ये माहीत होतेच संपूर्ण गावात बिबट्याची दहशत पसरली आहे. मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा या परिसरात वावर वाढला असल्याने परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त व भययीत आहेत.
वरवंड, कानगाव, केडगाव, पाटस, नानगाव या ऊसाच्या पट्ट्यातील गावामध्ये बिबट्याचा वावर वाढला असून या भागातील शेतकरी शेतात कामाला जाण्यास देखील नकार देऊ लागला आहे. महिलेच्या मृत्यूमुळे नागरिकांनी वन विभागाकडे बोट दाखवत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेचा तपास यवत पोलीस स्टेशन आणि वन विभाग करीत आहे.