*आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे शोकसंवेदना*
*माजी जिल्हा परिषद सदस्य पेंदाम मुतन्ना यांचे निधन*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*अहेरी:*-जिल्हा परिषदेत तब्बल चारदा निवडून गेलेले आणि बांधकाम व आरोग्य सभापती पद भूषविलेले पेंदाम मुतन्ना यांच्या निधनाची वार्ता अत्यंत वाईट व दुःखद असून अनुभवी आणि जुने जाणकार नेता हरविले अशा शब्दात आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी शोकसंवेदना व्यक्त करून पेंदाम मुतन्नाजी यांना श्रद्धांजली वाहिले तसेच पेंदाम कुटुंबियांच्या दुःखात सामील असल्याचे शोक संदेशात म्हटले. रविवार 8 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा सदस्य पेंदाम मुतन्ना यांचे अकस्मात निधन झाले.
पुढे शोकसंदेशात, आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, अहेरी तालुक्यातील देवलमरी नजीकच्या कोत्तागुडम या छोट्याशा गावातून पेंदाम मुतन्ना यांनी आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केले होते. प्रारंभी चंद्रपूर जिल्हा परिषदेत व नंतर गडचिरोली जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केले हे न विसरण्यासारखे असून जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करीत असताना जनहिताची कामे करून आजतागायत समाज सेवेत स्वतःला वाहून घेतले. आधी राजकीय विरोधक तर अलीकडे माझे कट्टर समर्थक म्हणून सामाजिक, राजकीय कार्य करीत होते त्यांच्या अकस्मात निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून पेंदाम परिवारावर हा एक प्रकारे आघात असून या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर शक्ती व बळ देओ असे म्हणत आपण सदैव पेंदाम परिवाराच्या पाठीशी असल्याचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी भावनेला वाट मोकळी करून दिले.