प्रलंबित कामांचा आढावा घेऊन विकासकामे मार्गी लावणार.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे भाजपा-महायुतीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या सूचनेनुसार सावनेर उपविभागाअंतर्गत सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील विविध ३२ शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक मंगळवार दि. १० डिसेंबर ला सकाळी ११ वा. तहसील कार्यालय सावनेर येथे आयोजित करण्यात येत आहे. डॉ आशिषराव देशमुख या बैठकीत प्रलंबित कामांचा आढावा घेतील आणि क्षेत्राच्या गतिमान विकास कामांसाठी उपयुक्त सूचना देतील.यावेळी सावनेरचे उपविभागीय अधिकारी श्री संपत खलाटे हे सुध्दा उपस्थित राहतील.
सावनेर-कळमेश्वर क्षेत्र हे विकासाच्या दृष्टीने मागील ३० वर्षांपासून अतिशय विकासशून्य आणि कमजोर असून भाजपाचे नवनिर्वाचित तडफदार आमदार डॉ. आशिष देशमुख हे या क्षेत्रातील मागील कित्येक वर्षांपासून मुद्दाम प्रलंबित ठेवलेली कामे प्राधान्याने मार्गी लावणार आहेत.जनतेच्या प्रगतीसाठी आणि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या असून या क्षेत्राला ते विकासाची नवी दिशा दाखवतील. डॉ आशिष देशमुख यांची आमदार झाल्यानंतर ही पहिलीच बैठक असून क्षेत्रात दमदार कामगिरीसाठी ते कटिबध्द आहे असे दिसून येत आहे.