संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- पुणे बालेवाडी येथे पार पडलेल्या ओकिनावा मार्शल आर्ट व कराटे शोटोकाई इंडिया या संस्थेमार्फत २७ वी ओकिनावा मार्शल आर्ट नेशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रशिक्षक प्रकाश पचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ओकिनावा मार्शल आर्ट्स स्कूल राजुराच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगटात सुयश संपादन करून शहरांचे नांव उंचावले. यामध्ये सुवर्ण पदक विजेते प्रथमेश पचारे (२०), ओम चुंबले (१५), तक्षु कडूकर, रजत पदक विजेते कु. वेदांती रागीट, सुरेखा अलोने, कास्य पदक विजेते प्रगती जेनेकर, तनवी रामटेके, आराध्या चांदेकर या स्पर्धेत विजयी झाल्या.
या सर्व विजयी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी पुष्पहार, शाल देवून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशिक्षक प्रकाश पचारे, संतोष गटलेवार, तलाठी सुनील रामटेके, देवराव रागीट, राजेंद्र जेणेकर, संतोष मेश्राम, अशोक राव यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.