विश्वनाथ जांभूळकर आलापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जारावंडी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जारावंडी गावात अण्णाभाऊ साठे मादगी समाज संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील तसेच परिसरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सपना कोडापे, सरपंच, जारावंडी यांनी भूषवले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वासुदेव कोडापे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, श्री. पंधरे मुख्याध्यापक, आश्रम शाळा, श्री. बारसागडे, श्री. वानखेडे, योगेश कुमरे, मुकेश कावळे, मल्लाजि येगंटीवार, लक्ष्मण चॅनेवार, दिलीप दास, संदीप येनगंटीवार, लोकेश येनगंटीवार, लक्ष्मी कुमरे, अन्नपूर्णा मोहुर्ले आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर विचार व्यक्त केले. सपना कोडापे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान निर्मितीमधील योगदानाचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, “बाबासाहेबांनी दिलेल्या समानतेच्या तत्वांमुळे समाजात मोठा बदल घडून आला आहे, आणि त्यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरत आहेत.”
वासुदेव कोडापे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी घेतलेल्या संघर्षावर भाष्य केले आणि युवकांनी त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. पंधरे सर, बारसागडे सर, आणि वानखेडे सर यांनी डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक न्यायासाठीच्या चळवळीवर प्रकाश टाकला. मुकेश कावळे यांनी बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान कसे काळाच्या पुढचे होते यावर भाष्य केले आणि त्यांचे विचार समाजाला दिशा देणारे असल्याचे नमूद केले.
यावेळी गावातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. उपस्थित लोकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला, आणि बाबासाहेबांच्या विचारांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा यावेळी मिळाली. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संदीप येनगंटीवार अध्यक्ष, अण्णाभाऊ साठे मादगी समाज संघटना यांनी केले. त्यांनी सर्व मान्यवर, आयोजक आणि नागरिकांचे आभार मानले आणि समाजहिताच्या कार्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.