प्रमिकेची हत्या करून मृतदेह नागपुर शहरातील वेळाहरी गावात पुरला.
पल्लवी मेश्राम, उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा चंद्रपूर पोलिसांनी भंडाफोड केला आहे. चंद्रपूर शहर पोलीस विभागातून बडतर्फ करण्यात आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच प्रेमिकेची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह बेलतरोडी मार्गावरील वेळाहरी गावाजवळ असलेल्या जंगलात खड्डा करून पुरला. या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला चंद्रपूर पोलिसांनी एका दुचाकी मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर या हत्याकांड उजागर झाले आहे. नरेंद्र डाहूले असे आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून अरुणा काकडे वय 36 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
हत्या करण्यात आलेल्या महिला अरुणा काकडे आणि आरोपी नरेश डाहूले लहान पणापासून एकाच शाळेत शिकले होते. दोघे वर्गमित्र होते. मात्र या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. दोघे नागपूरला गेले असताना दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीने अरुणा यांचा गळा दाबून हत्या केली.
प्राप्त माहितीनुसार, चिमूर येथील देवांश जनरल स्टोर्सच्या संचालिका असलेल्या अरुणा अभय काकड़े या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील रहिवासी आहेत. त्या दुकानात विक्रीसाठी कॉस्मेटिक वस्तू खरेदी करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी नागपुर येते आल्या होत्या. त्यानंतर त्या गांधीबाग येथील नंगापुतळा परीसरात पोहचल्या. दुपारी 12 वाजता अरुणा यांनी आपल्या पतीला फोन करून नागपुरात पोहोचल्याची माहिती दिली. त्यानंतर महिलेचा फोन स्विचऑफ झाला. सायंकाळ झाली तरी पत्नी घरी परतली नाही, त्यामुळे पती अभय काकड़े चिंतेत पडले. त्यांनी अरुणाची शोध घेतला आणि नातेवाईकांच्या मदतीने तिला शोधण्याचा प्रयत्न केला. पण कुठेही थांगपत्ता लागत नसल्याचे दिसताच पतीने अखेर चिमूर पोलीस स्टेशनला पत्नी हरविल्याबाबत तक्रार दाखल केली.
याबाबत नागपुर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर नागपूर शहर तहसील पोलिसांनी मिसिंगचा तपास सुरु केला. पण चंद्रपूर पोलीस दलातील सायबर सेलने तांत्रिक तपास करीत महिलेचा सीडीआर काढला. त्यात चंद्रपूर पोलीस दलातून बडतर्फ झालेला पोलीस कर्मचारी नरेंद्र डाहूले यांच्यावर संशय आला. त्याला नुकताच चंद्रपूर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. अरुणा काकडे हिच्या मिसिंगमध्ये त्याची भूमिका संशयास्पद वाटली. त्यामुळे त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या असता त्याने अरुणाचा गळा आवळून हत्या केल्याची माहिती दिली.
अरुणाचा गांधीबाग कारमध्ये ओढनीने गळा आवळला. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नागपुरातील काही भागात कार फिरवली. मात्र, जागा न मिळाल्याने तिचा मृतदेह कारमध्ये कोंबून बेलतरोडी मार्गावरील वेळाहरी गावाजवळील जंगलात पुरल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे त्याला चंद्रपूर पोलिसांनी नागपुरात आणले. त्याने अरुणाचा मृतदेह पुरल्याची जागा दाखवली. चंद्रपूर पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास चंद्रपूर पोलीस करीत आहे.