*प्रथम पारितोषिक पंचावन हजार पाचशे पाच रुपये तर द्वितीय पारितोषिक तेत्तीस हजार तीनशे तीन रुपये*
मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
आज सिरोंचा येथील एफ.सी.डी.मैदान येथे सिरोंचा प्रीमियर लीग सिजन 4 क्रिकेट सामन्याला सिरुवात झाली आहे.
ह्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजक मा. ना. धर्मराव बाबा आत्राम आमदार अहेरी विधान सभा क्षेत्र यांच्या कडून आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य क्रिकेट सामन्याचे उद्घटक म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गट सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी यांच्या हस्ते हित कापून करण्यात आले.
व नन्तर उद्घाटक म्हणून संबोधित करताना ते म्हणाले की सर्व युवक व युवतीनी क्रीडा स्पर्धेत पुढे आले पाहिजे व आपले कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे तेव्हाच आपण पुढे जाऊ असे उद्घाटक कोल्लूरी मधुकर यानी आपल्या भाषनेतून म्हणाले.
यावेडी नगर सेवक जगदीश रालबंडीवार, नगर सेवक सतिश बोगे,नगर सेवक सतिश राचर्लावार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतिश गंजीवार ,कृषि उत्पन्न बाजार समिती उपसभापती कृष्णमूर्ती रिक्कूला, ऍडव्हकेट फिरोज खान, पत्रकार नागभूषणम चकिनारपूवार, सिरोंचा चे प्रसिद्द कत्राटदार रमजान खान, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे बाबा कट्टर समरर्थक रवि सुलतान, ओंकार ताटीकोंडावार, सलार सय्यद, जुघूनु भाई, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष महिला उपाध्यक्ष आरवेल्ली म्याडम, फाजील पाशा, वेंकटी पुजारी व क्रिकेट प्रेमी व 7 संघ उपस्थित होते.