महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील राजाराम खांडला येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मधुकर गोंगले यांची मातोश्री लक्ष्मीबाई गंगाराम गोंगले यांचे आज दीर्घ आजाराने 70 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
लक्ष्मीबाई गंगाराम गोंगले या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या त्यांच्यावर मागील अनेक दिवसापासून उपचार सुरू होते. पण अखेर 70 व्या वर्षी त्यांनी घरीच अखेरचा श्वास घेतला. त्यांचा अस जाण्याने गोंगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर स्थानिक मोक्षधामावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे पच्छात 3 मुले, 1 मुलगी, नातवंड बराच मोठा आप्तपरिवार आहे.