रविंद्र भदर्गे,जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- पंचायत समितीच्या कारभारा विषयी लाभार्थी व नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीचे नेते पंचायत समितीचे माजी उपसभापती रामप्रसाद थोरात यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी राजेश तांगडे यांना भेटून निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची वाट पाहावी लागत आहे,शिक्षण विभागात ही शिक्षक, केंद्र प्रमुख हे अनधिकृत गैरहजर राहत आहे तसेच गटशिक्षण कार्यालयात सुद्धा कोणीच आढलून येत नाही, घरकुल योजनेच्या लाभार्थ्याना लाभ घेण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याशिवाय लाभ मिळत नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. तर रोहयोच्या कामात ही स्थानिक आमदारांच्या शिफारशी लागतात अशी चर्चा सुरू असून हे जर खरे असेल तर हे अन्यायकारक आहे, मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण मधील अनेक युवकांच्या नियुक्त्या रखडल्या आहे त्या देण्यात याव्यात पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी दिलेल्या वेळेत कार्यालयात हजर राहणे अपेक्षित असतांना नेहमी गैरहजर व कार्यालयात उशिरा येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन करण्यात येणार आहे असे ही यावेळी दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आल्या आहे.
निवेदनावर रामप्रसाद थोरात, रवि भदर्गे तालुका अध्यक्ष परतूर, सचिन सोनपसारे, दीपक वक्ते, मनोज वंजारे, विशाल भदर्गे, कैलाश देसमाने, प्रशांत वाकळे, गौतम मुंढे, दीपक भदर्गे, विकास प्रधान, धम्मरत्न मुंढे, बाभू सोमान मोरे, राजू गायकवाड, स्वप्नील पहाडे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.
पंचायत समिती परतूर येथे गाव गाड्यातील गोर गरीबांची कामे वेळेवर होत नाही याबाबत गटविकास अधिकारी श्री राजेश तांगडे यांना प्रत्यक्ष भेटून सांगितले की पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पिळवणूक होत आहे यासोबत कोणतेही लाभ घायचे असल्यास स्थानिक आमदार यांच्या शिफारसी शिवाय किंवा आर्थिक देवान घेवाण केल्याशिवाय कोणतच काम होत नाही म्हणून गटविकास अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन तत्काळ लोकांची होणारी गैरसोय धांबवावी अन्यथा येणाऱ्या काळात भव्य आंदोलन करण्यात येईल: रामप्रसाद थोरात, वंचित बहुजन आघाडी
