राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हिंगणघाट शहरच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन..
अनिल कडू, हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू अशा ८४ कलावंताचा सत्कार सोहळा स्थानीक साई मंदिर हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत तर प्रमुख पाहुणे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सहकार नेते वासुदेव गौळकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर उपस्थित होते.
राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या 84 वाढदिवसा निमित्त हिंगणघाट शहारातील 84 युवक नागरिकांच्या सत्कार सोहळाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट शहरच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी क्रीडा प्रशिक्षक शबाना कुरेशी, मुस्तफा बख्श, वैशाली वाठनकर, प्रशांत लेदाडे, अतुल झाडे, ज्येष्ठ नागरीक वासुदेव गौळकार, अशोक सोरटे, रुपेश लाजुरकर, विनोद भुते, प्रभाकर खोडे, डॉ.श्रिधर रेवतकर, कैलास आत्राम, विष्णूं इटनकर, शामराव खुडसंगे, आनंदराव धोटे अशा ८४ नागरीकांना सन्मानपत्र, शाल व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बोरकर तर आभार प्रदर्शन बालु वानखेडे यांनी मानले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हिंगणघाट युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अमोल बोरकर, अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारुती महाकाळकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे, साहेबराव येडे, सुनील भुते, उमेश नेवारे, महिला शहर कार्याध्यक्ष सीमा तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष मीना सोनटक्के, विद्या गिरी, आशा कोसुरकर, आंचल वकील, हेमंत घोडे, जितु रघाटाटे, गजानन महाकाळकर, सुनिल घोडखांदे, संजय गांभुळे, नदीम शेख, राहुल जाधव, राजू मुडे, शाहिद शेख, रोशन दांडेकर, आकाश हूरर्ले, सुनील ठाकरे, चेतन काळे, अमर धनविज, दिनेश नगराळे, वैभव भुते आदि पदाधिकारी उपस्थित होते.