प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी आंदोलनाला बसलेला लॉ चा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत निंदनीय असून या प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोषी अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज देवळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष, किरण ठाकरे, माजी नगराध्यक्ष गौतम पोपटकर, प्रविण कात्रे, दादाराव मुन, एकनाथ कांबळे, नरेश ओंकार, स्वप्नील मदनकर, दिलीप वाघमारे, कृष्णाजी भगत, महेंद्र खंतडे, सुधीर भगत, सौ. मयुरी बीजवार, कल्पना थुल, सिंधू ढोरे, वनिता निखाडे, गौरव खोपाळ, हनुमंत पचारे, सुरज रॉय, हितेश दिघीकर, सिद्धार्थ कांबळे सह महिला व अन्य सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.