सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात (दि. 19 ते 21 डिसेंबर) रंगय्यापल्ली केंद्राने उत्कृष्ट कामगिरी करत बहुमानाचे तीन चषक पटकावले आहेत. कबड्डी, खो-खो, वैयक्तिक स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत केंद्रातील विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण कामगिरी केली.
या स्पर्धांमध्ये रंगय्यापल्ली केंद्राने प्राथमिक विभाग चॅम्पियनशिल्ड, माध्यमिक विभाग चॅम्पियनशिल्ड आणि ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ शील्ड मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. या यशामागे विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि प्रयत्न आहेत.
श्री. मारबोईना सर (उच्च श्रेणी मुख्याध्यापक), श्री. वेलादी सर, श्री. धानोरकर सर, श्री. सद्दी सर, श्री. कांबळे सर आणि कु. वरगंटीवार मॅडम यांचे मार्गदर्शन तसेच केंद्र प्रमुख श्री. आय.जे. खान यांच्या नेतृत्वामुळे ही कामगिरी शक्य झाली.
या विजयामुळे रंगय्यापल्ली केंद्राचे नाव तालुक्यात गाजले असून, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वर्गात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.