अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! “संकल्प निरोगी हिंगणघाटचा” संत गाडगेबाबा यांचा पुण्यतिथी निमित्य विकी वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने आज ‘महाआरोग्य शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.
हे महाआरोग्य शिबिर आज दिनांक २४ डिसेंबर मंगळवारला शिव मंदिर, यशवंत नगर हिंगणघाट येथे या शिबिरचे आयोजन करण्यात आले. येथे दुपारी 11.00 वाजता, होणाऱ्या आरोग्य शिबिरामध्ये विविध तपासण्या, उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी नामांकित हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांचे सहकार्य असणार आहे. तरी नागरिकांनी या महाआरोग्य शिबिरामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन विकी वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.