उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्ह्यातील बाळापूर येथून एक अपघाताची घटना घडली आहे. एक लक्झरी बस भिकूंड नदीच्या पुलावरून खाली कोसळून हा भीषण अपघात झाला. संध्याकाळी 7.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
लक्झरी बस भिकूंड नदीच्या पुलावरून खाली कोसळून हा भीषण अपघात झाला. बसमधील सर्व प्रवासी हे वाशिम येथील रहिवासी असल्याची माहिती मिळून आली आहे. बसमधील प्रवासी हे अयोध्येवरून परत येत होते. बाळापुरजवळील भीकुंड नदीच्या पुलावर या खाजगी बसचा ब्रेक न लागल्याने ही बस पुलावरून नदीत कोसळली.
नदीला जास्त पाणी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कुठलीच जीवितहानी झाली नसून ५० प्रवासी सुखरूप आहेत. यात काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर बस चालवणारा क्लीनर फरार झाला आहे. या घटनेचा तपास बाळापूर पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांकडून बसच्या क्लीनरविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.
अकोला ते बाळापूर दरम्यान असलेल्या भिकूंड नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला. येथे एक खासगी बस थेट नदीपात्रात कोसळली. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी साडेसा त वाजताच्या सुमारास वाशिम येथील श्री मुर्डेश्वर कंपनीची एम एच ३७ बी ४९९९ ही खासगी बस भुसावळ येथून खामगाव मार्गे वाशिमकडे जात होती. ही बस पारस फाट्यावरून बाळापूरच्या दिशेने जात असताना उतारावरून थेट भिकुंड नदीपात्रात उलटली. त्यावेळी या बसमधून ५० प्रवासी प्रवास करत होते. या घटनेत जीवितहानी नसली तरी एका चिमुकलीसह सात प्रवाशी जखमी झाले आहेत.
