*ऊच्चस्तरीय चौकशी करुन संबंधीतांवर कठोर कारवाहीची मागणी.*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*अहेरी:-* राष्ट्रीय शिक्षा धोरण-२०२० नुसार देशाच्या एकूणच शैक्षणिक पध्दतीत आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभ्यासक्रमातील बदलांपासून ते कार्यपद्धतीत बदलापर्यंतचा हा मोठाच परिवर्तन आहे. यातीलच ‘अपार’ हा एक उपक्रम कार्यान्वित झाला आहे. याद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळखक्रमांक आणि सोबतच डिजिलॉकरची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. ‘एक देश, एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेच्या अंतर्गत हा उपक्रम आहे.परंतू गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी खुद्द पालकांकडून अपार नोदणीला अप्रत्यक्ष विरोध करण्यात येत असल्याने अपार नोंदणीला वेग मिळतांना दिसत नाही.बरेच पालक तर चक्क मुलाचे शिक्षण बंद करु पण अपार नोदणी करणार नसल्याची भुमिका घेत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
विशेषत्वे आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा याबाबतीत जास्तच अनुत्सुकता दिसत आहे.यामागे ख्रिश्चन मिशनरीचा हात असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार यांनी केला.आश्रमशाळेत शिकणार्या ओराँव समाजाची मुले अपारला विरोध करुन घरी परतत आहेत. ओराँव समाज १०० टक्के धर्मांतरीत आहेत. अपार नोंदणी मार्फत धर्माची माहीती घेऊन सरकार आदिवासी म्हणुन मिळणार्या सवलती बंद करतील अशी भिती पालकांना आहे. हळुहळु वेगवेगळ्या कारणांनी धर्मांतर न केलेल्यांमध्ये सुध्दा अपार आयडीला विरोध सुरु झाला आहे. डिलिस्टींगची भिती दाखवुन आदिवासी समाजात मिशनरी मार्फत भ्रम पसरविल्या जात असल्याचा आरोप मद्दीवार यांनी केला.आदिवासी समाज मुळातच फार भोळा असल्याने त्यांची वेळोवेळी सहजरीत्या दिशाभुल करुन वेगवेगळ्या यंत्रणा आपआपली पोळी शेकुन घेतात असे त्यांनी सांगितले.
