महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- सामाजिक कार्यकर्ते सुनील वासनिक आणि कृषी मंत्रालय नवी दिल्ली माजी आयुक्त डॉ. कृपाकर वासनिक यांची मातोश्री पुष्पाबाई प्रल्हाद वासनिक यांचं आज आजाराने दुःखद निधन झालं. त्यांनी 84 व्या वर्षी नागपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात 27 डिसेंबर 2024 रोज शुक्रवारला सकाळी 9.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्याच्यावर मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्यावर नागपूर येथील मानेवाडा मोक्षधाम येते दुपारी 3.00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मुतीशेष पुष्पाबाई वासनिक यांनी सुरुवातीला भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील धानला या गावात त्यांनी आपल्या पती बरोबर आपल्या संसार सुरू केला. त्यानंतर त्यांना 3 मुल आणि 3 मुली झाल्या. त्याच काळात दलीत वंचित समाजासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाची चळवळ जोमाने सुरू होती. काहीही झालं तरी वेळेप्रसंगी एक वेळ उपाशी राहिलो तरी चालेल पण आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांना उच्च पदी विराजमान करायचं हेच ध्येय घेऊन हजारो आई बाप आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी झपाटलेले होते. त्याच काळात पुष्पाबाई वासनिक यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिलं. त्यात डॉ. कृपाकर वासनिक हे नवी दिल्ली मध्ये कृषी मंत्रालयात आयुक्त पदी विराजमान झाले. दुसरा मुलगा दिवाकर वासनिक हे पण उच्च शिक्षण घेऊन पुण्यात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. तिसरा मुलगा सुनील वासनिक हे पण सामाजिक राजकीय चळवळीत अग्रेसर आहे.
मनमिळावू स्वभावाच्या पुष्पाबाई..
पुष्पाबाई वासनिक याचं आज आजाराने निधन झाल्याची माहिती गावात होतात गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दुःख झालं. मनमिळावू स्वभावाच्या पुष्पाबाई गावात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सर्व धर्मीय जातीतील लोक त्याचा आदर करत होते. पतीच्या निधनानंतर त्यांनी एकहाती संसाराचा गाळा हाकत आपल्या मुलांचा सांभाळ करत उच्च ध्येय गाठून दिले.
पुष्पाबाई वासनिक यांचं दुःखद निधननाने वासनिक कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या मागे तीन मुलं, तीन मुली, सूना, नातू- नाती, अशा मोठा आप्तपरिवार आहे.