श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी घटना मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडला पुणे येथून बेड्या ठोकल्या आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे.
वाल्मिक कराड सह फरार आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच वाल्मिक कराड च्या नातेवाईकांची देखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराडांचेही बँक खाते गोठवण्यात आले आहे.
देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी
फरार आरोपी नंबर 1 – सुदर्शन घुले
फरार आरोपी नंबर 2 – कृष्णा आंधळे
फरार आरोपी नंबर 3 – सुधीर सांगळे
जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना पोलिसांनी आधीच अटक केलीय. तसेच या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेतलं जातय. विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी देखील वाल्मिक कराडवर या हत्या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. असं असलं तरी पोलिसांनी वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला कोणत्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलीय हे पहाणे महत्वाच ठरणार आहे.