उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पट्टणकोडोली:- भातरतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडी करून देणाऱ्या स्त्रियांच्या उद्गारकर्त्या, माता सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंती निमित्त, बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कुल पट्टणकोडोली मध्ये विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विशेष करून सर्व वर्गातील मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती व बऱ्याच मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत त्यांच्या जीवनावर आधारित माहिती आपल्या वक्तृत्वातून सादर केली.
सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गशिक्षकांचे, मुख्यधापकाचे व संचालक जितेंद्र वसगडेकर व प्रमोद बोरगावे यांचे मार्गदर्शन लाभले त्याच बरोबर पालकांनी सुद्धा आप आपल्या पाल्यांची उत्तम अशी तयारी करून घेतलेली पहावयास मिळाली. ह्यामध्ये अद्वीता अंबर बनगे, साई स्वस्तिक बेहेरा, प्रीशा प्रशिक त्रिरत्ने, मयुरी मनोज पाटील, मंजीत कुमार भारती या विद्यार्थीनि भाषण दिले. त्यांना त्यांच्या वर्ग शिक्षिका नीता पाटील ह्यांचे सहकार्य लाभले.