आसमा सय्यद, पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- उंड्री येथून एक खळबळजनक अपघाताची घटना समोर आली आहे. कानडेनगर येथे भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एक डॉक्टर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवार दि.8 जानेवारी रोजी घडली असून डॉ. प्रणाली तन्मय दाते वय 34 वर्ष रा. अर्बन नेस्ट सोसायटी उंड्री असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ट्रक चालक पांडुरंग बलभीम भोसले वय 35 वर्ष, मूळ गाव तुळजापूर, धाराशिव याने घटनास्थळावरून पलायन केल्याने ‘सीसीटीव्ही’च्या आधारे शोधून त्याला अटक करण्यात आली.
अपघातात मृत डॉ. प्रणाली दाते या 12.30 वाजताच्या सुमारास उंड्रीकडून हांडेवाडीच्या दिशेने जात होत्या, त्याचवेळेस पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्या रस्तावर पडल्या त्याचवेळी त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
अपघात झाल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळा वरून पळून गेला होता. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासून ट्रकच्या शोध घेतला आणि त्याला अटक करण्यात आली.
डॉ. प्रणाली दाते यांच्या पश्चात त्यांचे डॉक्टर पती आणि एक मुलगा असा परिवार आहे. या अपघाताच्या घटनेमुळे दाते कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगळ कोसळले आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.