रवींद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम बापानेच आपल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार घडली आहे. या घटनेमुळे जालन्यामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. 2018 हा नराधम बाप आपल्या मुलीवर वारंवार बलात्कार करत होता.
जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार: बापानेच आपल्या मुलीवर अत्याचार करून बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासला आहे. हा नराधम बाप या बाबत कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देत होता. याप्रकरणी जालन्यातील मौजपुरी पोलिस स्टेशन मध्ये या नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जालन्यात जन्मदात्या नराधम बापाने 2018 धमकी देत आपल्या अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार बलात्कार केला. कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे मुलगी घाबरली होती असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात मुलीच्या तक्रारीवरून जालन्यातील मौजपुरी पोलीस स्टेशन मध्ये विविध कलम त्यात पोस्को कायद्यांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना पोलिसांनी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर भोजपुरी पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीने मुलीवर 2018 पासून 2025 पर्यंत विविध स्थिकाणी बलात्कार केल्याची माहिती मुलीने पोलिसांना तक्रार देताना दिली. या घटनेमुळे जालना हादरले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत.