मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा समतोल बिघडत चालले आहे. त्याचे फळे सर्व मानव जातीला भोगावे लागत आहे. पर्यावरणाचा ऱ्हासामुळे पुढे अजून किती कष्ट भोगावे लागू शकणार हे कुणी सांगू शकत नाही. त्यामुळे विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून पर्यावरणाचा संदेश देणारा हिंगणघाट येथील लकी सर्वाचा चर्चेचा विषय ठरला आहे.
सहजीवनात पदार्पण करीत असतांनाही त्याला पर्यावरणाची जाणीव व चिंता त्यांच्या ध्येयवादी जीवनाप्रमाणेच लाखमोलाची. त्यामुळेच स्वतःच्या विवाह सोहळ्याची निमंत्रण पत्रिकाही त्याच्या आजवरच्या ईदम नमम या जीवनदृष्टीला शोभेसी. लकी खिलोसिया या पर्यावरण, वृक्षारोपण व शिक्षण या क्षेत्रासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या युवकाच्या स्वतःच्या विवाह सोहळ्याची निमंत्रण पत्रिकाही तशीच अफलातून.
ही विवाह पत्रिका व ज्या आर्ट पेपरवर छापलेली आहे तो कागद हा ग्राम आर्ट प्रोजेक्ट द्वारा तयार करण्यात आलेला आहे. ही संस्था नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा ह्या गावातील असून शेतातील काडीकचऱ्यांच्या माध्यमातून जवळपास 300 महिलांना रोजगार देणारी ही संस्था आहे. ही पत्रिका ह्या संस्थेच्या ग्रामीण महिलांनी आपल्या हातानी खराब कागद व शेतातील अन्य कचरा व अन्य वस्तू सडवून त्यापासून कागद तयार करून ही पत्रिका तयार केलेला आहे. या पत्रिकेसोबत एक सीड बॉल आहे. तो कागदाने तयार केलेला असून त्याच्या आत अगस्ती ह्या वृक्षाचे बी आहे. हें बी अंगणात किंवा मोकळ्या जागेवर लावता येऊ शकत. झाडाचे फूल हें भाजी व अन्य जीवनावश्यक वस्तूसोबत खाता येत.
भारतीय संस्कृतीत वृक्षसंवर्धनाचा विचार झालेला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण, मानवाच्या हस्तक्षेपाने ढळत चाललेले पर्यावरणाचे संतुलन रोखण्याची आज नितांत गरज आहे या उदात्त हेतूने लकी खिलोसिया या तरुणाने खारीचा वाटा म्हणून पर्यावरण पूरक लग्नपत्रिका तयार करून प्रत्यक्ष कृतीने एक आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे. बोले तैसा चाले या उद्देशाने प्रेरित झालेल्या ह्या युवकांने परिणय एवं पर्यावरणाचा हा उत्सव साजरा करण्याचा मानस निश्चित समाजात एक पर्यावरणाविषयी जन जागृती करणारा आहे. लकीच्या ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.