सौ.हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694.
बल्लारपूर:_दिनांक 06 जानेवारी 2025 ला वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहर द्वारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयाला निवेदन सादर करुण निवेदनात मागणी करण्यात आली आहे की शहरांमध्ये होत असलेला गढूळ पाण्याचा पुरवठा त्वरित थांबून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावा ज्या नळग्राहकांना फाल्टी मीटरच्या नावाने जास्त बिल देण्यात आलेले आहे त्यांना वार्षिक सरासरीच्या अनुरूपात बिल देण्यात यावे अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे पाण्याचे मीटर जर हवेच्या दाबाने फिरत असेल तर ग्राहकांना ना स्लॅप सिस्टीम बिल असल्यामुळे अतिरिक्त बोजा सहन करावा लागत आहे त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक तर शहराला 24 तास पाणी पुरवठा करावा किंवा मीटर सिस्टम बंद करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने निवेदनात केलेली आहे व शहरातील नागरिकांना सुद्धा वंचित बहुजन आघाडी तर्फे आव्हान करण्यात येत आहे की ज्यांचे मीटर हवेच्या दाबाने फिरत असेल त्यांनी मीटरची व्हिडिओ रेकॉर्डिंग करावी व ती रेकॉर्डिंग वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यां पर्यंत पोहोचवावी जर पाणी गडुळ येत असेल तर त्याचे सॅम्पल देखील व्हिडिओ रेकॉर्डिंग करुण जमा करावा व ते सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्या पर्यंत पोहोचवावे असे आव्हान शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू यांनी नळ ग्राहकांना केले आहे निवेदन सादर करण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे
शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू , शहर महासचिव गौतम रामटेके, महिला आघाडी शहराध्यक्ष रेखाताई पागडे, जिल्हा संघटक अजय गावंडे, किरणताई रामटेके ,कुंजबिहारी बटघरेसर ,देवराम नंदेश्वरसाहेब, प्रकाशभाऊ तावडे, सुधाकर गेडामजी , प्रकाश रामटेके, निवृत्तीजी गायकवाड ,दुरेश तेलंग, अभिलाष चुनारकर , सुरज शृंगारे, स्वराज करमरकर, मारुतीभाऊ निवलकर, प्रणाली गवई, रुक्मिना गवई, भावना वावरे, बहुजन आघाडीचे आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती एका पत्रकाद्वारे शहर महासचिव गौतम रामटेके यांनी दिली.