संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यातील मौजा स्मार्ट ग्राम बिबी येथे स्वसावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाच्या पटांगणावर स्व. निवृत्तीभाऊ नामदेवराव ढवस यांच्या स्मृति प्रित्यर्थ कॅलिबर फाउंडेशन, गडचांदूर आणि जय शिवशंकर क्रीडा मंडळ, बिबी यांच्या वतीने दोन दिवसीय प्रो- कबड्डी सामने दिनांक 10 ते 11 जानेवारी 2025 या दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष साईनाथ कुळमेथे माजी सभापती, पंचायत समिती कोरपना, सभापती अशोकराव बावणे, स्वागताध्यक्ष प्रा. आशिष देरकर, कॅलिबर फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उपसरपंच स्मार्ट ग्राम बिबी, सरपंच माधुरी टेकाम, कमलाबाई ढवस, सुमित्रा राजुरकर, आनंदराव पावडे, रामदास देरकर, उत्तमराव काळे, उमेश राजूरकर, शैलेश लोखंडे, देवराव इंगळे, शेख रसिद यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.