मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, चोऱ्या, दारू व एम.डी अंमली पदार्थ विक्री सुरू असल्यामुळे शहरात तरुण पिढी व्यसनाधीन होऊन बर्बाद होत आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, यांना शहरातील अवैध धंदे, चोऱ्या, दारूविक्री व एम.डी सारखे अमल़ी पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री करण्यावर आळा घालण्याकरिता निवेदन देण्यात आले.
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख सतीश धोबे तथा माजी नगरसेवक, मनीष देवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांना खालील विषयावर निवेदन देण्यात आले.
आतापर्यंत पाहण्यात आले की, मागील काळात माजी आमदार वसंतराव बोंडे, अशोक शिंदे, राजु तिमांडे यांच्या काळात जिल्ह्यातील दारूबंदी असताना सुद्धा दारूची विक्री होत होती. परंतु त्यावेळी हिंगणघाट तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्रास दारूची विक्री होत नव्हती जी मागील या 7 वर्षात होतांना दिसत आहे. या दारूच्या विक्री सोबत आता तर अमली पदार्थ (एम.डी) गांजा सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री व सेवन सुरू आहे. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होऊन बर्बाद होत आहे.
शहरात अवैध दारू, गांजा, एम डी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या लोकांच्या मागे सत्ताधारी पुढाऱ्याचा आशीर्वाद आहे म्हणून हे गुन्हेगार पोलिसांना जुमानत नाही. त्यांना जनतेशी काहीही देणे घेणे नाही. आज या अवैध धंद्यामुळे आज शहरात सामाजिक दुष्परिणाम दिसून येत आहे. मुलांच्या कुटुंबात वाद विकोपाला जाऊन भांडणे, मारामारी होतांना दिसत आहे आणि चोऱ्याच प्रमाण सुध्दा वाढलेले दिसत आहे. शहरातील अवैध साहित्य विक्रीचे काही मुख्य ठिकाण आहे, जसे चहाची टपरी, पान टपरी इत्यादी या ठिकाणी विक्री होताना पाहण्यात आले आहे. विक्री करणारे कोण आहे या संदर्भात पोलीस विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना माहित आहे. परंतु पोलीस कर्मचारी कायदेशीर कारवाई करताना कुठेतरी मागेपुढे बघतात. त्याचे कारण सुद्धा असे असू शकते की, जी मंडळी अशा प्रकारची विक्री करणाऱ्यां लोकांच्या पाठीमागे सत्ताधारी पक्षाचे नेत्यांचे पाठबळ आहे. म्हणून पोलीस कर्मचारी कायदेशीर कारवाई करताना दिसून येत नाही.
त्याचप्रमाणे शहरात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या ट्रॅक्टर टिप्पर व ट्रॅक्टर द्वारे वाळू चोरीचे प्रमाण वाढले आहे. वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या लोकांवर पोलिसांचा धाक राहिला नाही किंवा ते पोलिसांना जुमानत नाही. पूर्वी रात्रीच्या वेळी रेती चोरीचे वाहतूक व्हायची, परंतु आता तर सर्रास दिवसाढवळ्या चोरीची वाहतूक होत आहे .
शहरातील मधल्या भागात त्याचप्रमाणे विरळ भागात चोरीचे, घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात आपल्या विभागामार्फत पोलीस पेट्रोलिंग वाढवली पाहिजे. शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्थानक येथे रात्रीच्या वेळी ऑटो उभे असतात त्यांना आपल्या विभागामार्फत चौकशी करून ओळख प्रमाणपत्र देऊन रात्रीला वाहने ठेवण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून लोकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोयीचे होईल.
शहरात इतर राज्यातील तसे उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान इत्यादी राज्यातून येणारे लोक या शहरात तसेच वार्डात व्यवसाय करण्याच्या रूपात गालिचा, सतरंजी, चादर व इत्यादी वस्तू विकतात. असे लोक शहरात कुठल्या ठिकाणी वास्तव्यास आहे. याबाबत तपशीलवार माहिती घेणे आवश्यक आहे. यावर सुद्धा लक्ष ठेवले पाहिजे. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य रस्त्यावरील व मुख्य ठिकाणी लावण्यात आलेले CCTV कॅमेरे सुरू करण्यात यावे.
लोक अवैधरित्या वाळू चोरी, आमली पदार्थ, दारूची वाहतूक, विक्री करताना त्या लोकांच्या पाठीमागे कितीही मोठ्या नेत्याचे पाठबळ असले. तरी त्याची चिंता न करता आपण या शहरातील तरुणपिढी तसेच सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कुठल्याही शक्तीला न घाबरता कारवाई करावी अशी अपेक्षा आपल्याकडून आणि आपल्या विभागाकडून आहे. अन्यथा आम्हाला नाईलाजाने पोलीस अधीक्षक वर्धा यांना भेट घेऊन निवेदन द्यावे लागेल.
निवेदन देते वेळेस उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाणे, गजानन काटवले, श्रीधर कोटकर, शंकर मोहम्मारे, मनोज वरघणे, भास्कर ठवरे, फिरोज खान पठाण, अनंता गलांडे, शितल चौधरी, नितीन वैद्य, प्रशांत कांबळे, प्रशांत सुपारे, संजय रहाटे, सुनील आष्टीकर, दिलीप चौधरी, श्रीकृष्ण रामगडे, विशाल माथनकर, अमोल वादाफळे, अनंता सोरटे, सतीश लोणारे, संतोष फटिंग, संजय लाखे, महेंद्र गेडेकर, अतुल भोसले व इत्यादी शिव सैनिक उपस्थित होते.