संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 10 जाने:- मनोज गौरकार गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती राजुरा व मंगला तोडे (शि.वी.अ) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धा आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा विद्यामंदिर राजुरा येथे नुकत्याच संपन्न झाल्या. नवरत्न स्पर्धाचे उदघाटक म्हणून हेमंत भिंगारदेवे, गटविकास अधिकारी पंचायत समिती राजुरा यांची उपस्थीती होती. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मनोज गौरकार, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजुरा प्रमुख अतिथी म्हणून सतीश धोटे, अध्यक्ष बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ, मंगला तोडे शिक्षण विस्तार अधिकारी, संजय हेडावू शिक्षण विस्तार अधिकारी, विशाल शिंपी शिक्षण विस्तार अधिकारी, नलिनी पिंगे, मुख्याध्यापिकका आदर्श प्राथमिक शाळा, जुनघरे, नारायण तेलकपल्लीवार, त्रिपत्तीवार रामा पवार, किरण कामडी केंद्रप्रमुख आदींची उपस्थिती होती. तर स्पर्धेचे प्रमुख परीक्षक मोहनदास मेश्राम, धनंजय डवरे, अनिल काकडे, बादल बेले, ज्योती कल्लूरवार, रोशनी कांबळे, वैशाली टिपले यांची उपस्थीती होती.
आदर्श विद्यामंदिर राजुरा येथील विद्यार्थिनींद्वारे मनमोहक गणेश वंदनानृत्य व वृक्षभेट देऊन मंचावर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून कऱण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंगला तोडे (शि.वी.अ) यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेन्द्र राहंगडाले व ज्योती गुरनुले यांनी केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता जांबुलवार, कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक सतीश धोटे यांनी विद्यार्थी हा शिक्षक व त्यांचे कलागुण हेरणारा असावा यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक हेमंत भिंगारदिवे, गटविकास अधिकारी पंचायत समिती राजुरा यांनी भारतीय संस्कृतीचा वारसा कसा जपावा व एकविसाव्या शतकातील विद्यार्थी कसा असावा यावर मार्गदर्शन केले. मनोज गौरकार, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती, राजुरा यांनी अध्यक्षीय भाषणातून नवरत्न स्पर्धा व विद्यार्थी विकास यावर प्रकाश टाकला. एकूण नऊ विविध स्पर्धामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटात ही स्पर्धा पार पाडली. ज्यामध्ये विद्यार्थ्यानी आपल्या निपुणतेची चुणूक दाखविली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व केंद्र प्रमुख, नेहमी तत्पर असलेली बीआरसी चमू रीता देरकर, गीता जांबुलवार, ज्योती गुरनुले, राकेश, मुसा शेख, ढगे, देव, बहादुरे, भुरे, चाचरकर, सोमलकर, डोरलीकर, वांदिले यांच्या सहकार्यने ही स्पर्धा उत्तमरीत्या पार पडली. प्रमाणपत्र लेखनकार्य मुसा शेख, किसन बावणे, शंकर पोटे, शंकर मडावी, विकास बावणे यांनी उत्तमरित्या पार पाडले. सर्वं परीक्षकाने अतिशय पारदर्शकपणे या स्पर्धातील सहभागी विद्यार्थ्यांच्या कलेचे परीक्षण केले. नलिनी पिंगे मु. अ. आदर्श विद्यामंदिर व सारिपुत्र जांभूळकर मु.अ.आदर्श हाय राजुरा तसेच यांच्या संपूर्ण टीमने उत्तम प्रकारे सहकार्य केले. विजयी स्पर्धक विद्यार्थांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व सहभागी मार्गदर्शक शिक्षक यांचे छान सहकार्य लाभले.