*कोणीही नायलॉन मांजा विक्री करू नये. असे आवाहन अहेरी पोलीस स्टेशन कडून दुकानदारणा करण्यात आले आहे*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809
अहेरी पोलीस स्टेशन हद्दीत अनेक दुकानात धाड टाकून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
अप. क्र.कलम 223 भा न्या सं सह कलम 5,15 पर्यावरण संरक्षण कायदा 1986
4) फिर्यादीचे नाव – सरतर्फे देवेंद्र चुनीलाल पटले,वय 38 वर्ष धंदा- नोकरी ( सहा पोलीस निरीक्षक) पोलीस स्टेशन अहेरी ता.अहेरी,जि-गडचिरोली मो. क्र. 9970871536
5) आरोपीचे नाव- शालिकराम शिवाजी बान्ते वय-55 वर्ष जात- कुणबी धर्म- हिंदू,रा.बाजारवाडी आलापल्ली वार्ड क्रमांक 4 ता. अहेरी जि. गडचिरोली
6) घटनास्थळ- मौजा-बान्ते किराणा स्टोर्स बाजार वाडी आलापल्ली 07 किमी पूर्व
7) घटना ता वेळ-दिनांक 10/01/2025 चे 20.00 वा. ते 20.45 वा. दरम्यान
8) दाखल ता वेळ -दिनांक 10/01/2025 चे 23/27 वा.साना.क्र.54/2025
9) मिळालेला माल – 02 नग MONO KITE नावाचे लेबल असलेले नायलॉन मांजा पिवळा रंगाचा असलेली रिल प्रत्येकी विक्री किंमत अंदाजे 500/- रु एकुण किमंत 1000/- रु
10) दाखल अंमलदार मपोहवा/2687 शारदा अर्का, पोलीस स्टेशन अहेरी
11) तपासी अंमलदार – मपोना/5362 मनिषा मुलकावार , पोस्टे अहेरी मो.क्र. 9420496587
हकिकत याप्रमाणे आहे की, घटना ता वेळी व ठिकाणी यातील नमूद आरोपीने त्याचे किराणा दुकानात MONO KITE नावाचे लेबल असलेले नायलॉन मांजा पिवळा रंगाचा असलेली दोन रिल अवैधरित्या विक्री करिता बाळगून मिळून आला तसेच सदर आरोपी याने मानवी जीवतास व पशु पक्षाचे जिवीतास धोका निर्माण होईल असा मांजाचा माल विक्रीसाठी ठेवून मा.जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे नायलाॅन मांजा धागा निर्मिती विक्री व वापर न करण्याबाबतचे सक्त मनाई आदेश जारी करण्यात आले आहे. क्र कार्या-2/-अ.का.दंडा /कावि/1227/2024 दि. 03/12/2024 च्या मनाई आदेशाचे उलंघन केल्याने सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.