संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा राज्यात आणि भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात वर्चस्व बघायला मिळत होते. त्यांना शिंदे मंत्रीमंडळात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या ३ खात्यांचे कॅबिनेट मंत्रीसह चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री बनवलं होत.
नुसत्याच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार वापसी करत एकहाती सत्ता स्थापन केली आणि राज्याचे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. पण त्यात भाजपच्या जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचं नाव नसल्याने सर्वांना एकच धक्का बसला होता. त्यामुळे राज्यात विविध चर्चेला उधाण आले. सुधीर मुनगंटीवार यांचे राज्यातून राजकीय अस्तित्व मिटविण्याचे भाजपा कडून काम सुरू झाल्याच्या बातम्या आल्या. पण आता तर चंद्रपूर जिल्हातून त्यांचें राजकीय राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे.
चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या मतदारसंघात झालेल्या कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले. किशोर जोरगेवार यांना भाजपमध्ये सामील होण्यापासून रोखण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांनी कधी काळी प्रयत्न केले होते, मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किशोर जोरगेवार यांना पाठिंबा दिल्याचं चित्र समोर येत आहे.
या महत्त्वाच्या कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित नव्हते. त्यामुळे मग तर चर्चा होणारच. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यक्रमासाठी सुधीर मुनगंटीवार यांना आमंत्रण दिलं होतं, परंतु त्यांनी फोन उचलला नसल्याचं किशोर जोरगेवार म्हणाले. सुधीर मुनगंटीवार याची या कार्यक्रमाला अनुपस्थिती ही भाजपमधील अंतर्गत गटबाजीचे संकेत देत आहे.
आमदार जोरगेवार यांना मिळणारा पाठिंबा आणि सुधीर मुनगंटीवार यांना बाजूला ठेवण्यात येत असल्याने भाजपमधील अंतर्गत मतभेद स्पष्ट होत आहेत. चंद्रपूरमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वात होणारे बदल हे सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकीय भविष्यावर परिणाम करणारे ठरू शकतात.
सुधीर मुनगंटीवार हे राज्यात आणि विदर्भात भाजपचे राजकारणातील एक प्रमुख चेहरा मानले जात होते. परंतु, सध्या भाजपमधील त्यांचा प्रभाव कमी होत असल्याचं संकेत मिळत आहेत. आगामी काळात भाजपमधील त्यांच्या भूमिकेवर आणि चंद्रपूरच्या राजकारणावर या बदलांचा मोठा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे. यापुढे चंद्रपुरातील भाजपच्या राजकीय समीकरणात कोणते बदल होतात आणि सुधीर मुनगंटीवार यांची पुढील रणनीती काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

