Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे: 10 लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिल्याने डॉक्टर तरुणीने केली आपल्याच रुग्णालयात आत्महत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 19, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: 10 लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिल्याने डॉक्टर तरुणीने केली आपल्याच रुग्णालयात आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 25 वर्षीय एका महिला डॉक्टरने आपल्या स्वतःच्या रुग्णालयात आत्महत्या खळबळ माजली आहे. 10 लाख रुपये घेऊन तरूणाने लग्नास नकार दिल्याने महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पल्लवी पोपट फडतरे वय 25 वर्ष राह. बिबवेवाडी असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. ही घटना बिबवेवाडीतील पीएमटी कॉलनी येथील तुळजाभवानी सोसायटीत 7 जानेवारी रोजी घडली होती.

पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे सांगून या महिला डॉक्टरला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून 10 लाख रुपये घेतले. त्यानंतर तिला आपले लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिला मानसिक धक्का बसला त्यातून महिला डॉक्टरने विषारी औषध घेऊन आपल्याच रुग्णालयात आत्महत्या केली.

याबाबत पोपट बाबुराव फडतरे वय 58 वर्ष, रा. बिबवेवाडी यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. त्यावरुन बिबवेवाडी पोलिसांनी कुलदिप आदिनाथ सावंत वय 30 वर्ष, रा. उमराणी रोड, शंकर कॉलनी, जिल्हा सांगली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी कुलदिप सावंत याने लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपण अविवाहित असल्याचे भासवुन नोंदणी केली. फिर्यादी यांना तो देहु येथे समक्ष जाऊन भेटला. फिर्यादी यांना त्याचे वागणे व आरोपीचा दवाखाना योग्य वाटले नाही, म्हणून त्यांनी कुलदिपला नकार कळविला होता. असे असताना फिर्यादींच्या अपरोक्ष त्याने त्यांच्या मुलीशी पल्लवीशी संपर्क साधला. तिला लग्नाचे आमिष दाखविले. पल्लवी ही बीएमएसएच झाली असून तिचे तुळजाभवानी सोसायटीत स्वतःचे रुग्णालय आहे. कुलदिप याने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून वेळोवेळी 10 लाख रुपये घेतले.

त्यानंतर पल्लवी फडतरे हिने कुलदिप सावंत याच्याकडे लग्नाचा विषय काढल्यावर कुलदिप सावंत यांनी सांगितले की माझे लग्न झाले असून आपली पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पल्लवी ला मोठा मानसिक धक्का बसला. तिने त्याच्याकडे 10 लाख रुपये परत करण्याची मागणी केली. परंतु, तो टाळाटाळ करु लागला. तेव्हा तिने चिठ्ठी लिहून आपल्या रुग्णालयातच विषारी औषध घेतले. ही बाब समजल्यावर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना 8 जानेवारी रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. याबाबत बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Tags: Doctor SusideLady Doctor SusidePune newsPune policeपुणे: 10 लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिल्याने डॉक्टर तरुणीने केली आपल्याच रुग्णालयात आत्महत्या.
Previous Post

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावले गडचिरोलीचे युवक.

Next Post

माजी सभापती भास्कर तलांडे व सुरेखा आलाम यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी सभापती भास्कर तलांडे व सुरेखा आलाम यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.

माजी सभापती भास्कर तलांडे व सुरेखा आलाम यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In