प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-विद्या विकास शिक्षण संस्था व पांडुरंग तुळसकर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट, हिंगणघाट द्वारा आयोजित उत्सव संस्कृतीचा… रंग माझ्या पांडुरंगाचा… सांस्कृतिक महोत्सव 2025 आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधीर कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या विकास शिक्षण संस्था, हिंगणघाट अध्यक्ष डॉ. उमेश तुळसकर हे होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ह.भ.प. खडसे महाराज, ह.भ.प. भोयर महाराज, प्रा. विकास कनिष्ठ महाविद्यालय, गिरड प्रा. अभिजित डाखोरे, प्राचार्य, तुळसकर कॉलेज ऑफ फॉर्मसी, हिंगणघाट डॉ. महेंद्रजि गुंडे, कार्य. प्राचार्य, तुळसकर इन्स्टिटयूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हिंगणघाट प्रा. राकेश साटोणे, प्राचार्य, विद्या विकास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, हिंगणघाट प्रा. नितेश रोडे, मुख्याध्यापक, ब्रिलियंट सी.बी.एस.ई. स्कूल, हिंगणघाट प्रा. अभयजी दांडेकर, उपमुख्याध्यापक मातोश्री आशाताई कुणावार महिला कॉलेज, हिंगणघाट डॉ. सपना जयस्वाल तसेच शिक्षक, शिक्षिकेत्तर, विद्याथी व विद्याथीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

