मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
आज दिनांक 24 जानेवारी रोजी डी.बी.ए. पब्लिक स्कूल अहेरी येथे माता पालक मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पालक माता भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सदर मेळाव्याचे आयोजन डी.बी.ए. पब्लिक स्कूलच्या वतीने करण्यात आला होता. मेळाव्याला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.यावेळेस त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना आजच्या ‘स्त्री’ मध्ये संपूर्ण जगाचा उद्धार करण्याची शक्ती आहे. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात स्वतःला कमजोर समजू नये.पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आज महिला पुढे जात आहेत. त्यामुळे आपणही स्वतःला कमजोर समजू नये असे मार्गदर्शन महिलांना केले.
यावेळेस विविध प्रकारचे खेळ उखाणे घेण्यात आले. हळदी कुंकू व वान सुद्धा वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सपना वेन्नुरी, सपना मेश्राम मनीषा मूडपल्लीवार, वैष्णवी कैदलवार, हिना पठाण, प्रदीप देशपांडे, विकास आचेवार, रणजित सोनावणे कशिष शेख, मनोज कैदलवार, सविता रामटेके, मनीषा ठाकरे, निखिल, श्रीलता श्रीरामवार आदींनी सहकार्य केले.