*राजाराम जिल्हा परिषद केंद्र शाळेत व्य. स्था. समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार यांचे हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. ‘भारताचे संविधान’ संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. असे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील आईंचवार यांनी मनोगतात म्हटले आहे.जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी १९२९ रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण होऊन त्याला वंदना दिली जाते, भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.
भारताला ब्रिटीश राजवटी पासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा भारताला स्वतःचे संविधान नव्हते. *भारताचे कायदे हे ब्रीटीश राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापन केली गेली.*
ज्या संविधानाच्या अनुषंगाने आज देशात काम चालू आहे तो मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ.भारतरत्न बाबासाहेब यांनी तयार केला. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे 26 नोव्हेंबर 1949 रोजी सादर केला. 2 वर्ष, 11 महिने नि 18 दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. अनेक सुधारणा आणि बदलांनंतर, समितीच्या ३०८ सदस्यांनी २४ जानेवारी १९५० रोजी
दोन हस्त लिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले आणि देश लोकशाही प्रधान बनला.भारताचे संविधान जगात सर्वात मोठे आहे. भारतीय संविधानात महत्वपूर्ण तत्वे असून,या तत्वाच्या आधारावर देशातील सरकार आणि नागरिकां साठी अधिकार,मार्गदर्शक तत्वे,कायदे ठरवण्यात आले आहे.या वेळी शाळा व्य, स्था, समितीचे पद अधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते तर, राजाराम ग्रामपंचायत मध्ये गावातील सरपंचा मंगलाताई आत्राम यांचे शुभ हस्ते पार पाडण्यात आले आहे.या वेळी उपस्थित उपसरपंच रोशन कंबागौनीवार, माजी पंचायत समितीचे सभापती भास्कर भाऊ तलांडे तसेच ग्रामपंचायत पदअधिकारी उपस्थित होते. तर जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.तर राजाराम पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी सचिन चौधरी साहेब यांचे शुभ हस्ते ध्वजारोहनाचा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न करण्यात आले आहे. या वेळी अंमलदार, एस. आर. पी.एफ.चे जवान उपस्थित होते. आणि भगवंतराव आश्राम शाळेत शा, व्य, समितीचे अध्यक्ष व्यंकटेश अर्का यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम मोठया उत्सहात साजरा करण्यात आले आहे.या वेळी माध्यमिकचे मुख्याध्यापक महादेव बासनवार शिक्षक उपस्थित होते तसेच आश्राम शाळेतील संपूर्ण शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.व प्राथमिक आरोग्य पथक राजाराम येथे.डॉ, राजेंद्र मानकर साहेब यांचे हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम घेण्यात आले आहे. या वेळी सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.