कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिदासजी घुटके यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले आहे.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज तर्फे ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व प्रथम भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पित करण्यात आली मारोती जांभूळकर सर, एकनाथ पाटील, समिती च्या अध्यक्षा कविता मेश्राम, कल्पना कापसे, सोमवती लंजे यांनी आदरांजली वाहीली. तर ध्वजारोहण हरीदासजी घुटके व समिती च्या सचिव ममता जांभूळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेची सगळ्यांना शपथ देण्यात आली तद्नंतर विहारांमध्ये सामूहिक वंदना घेण्यात आली व अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले.संचालन डॉ. वंदना घोंगडे यांनी केले तर पाहूण्यांचे स्वागत रश्मी गेडाम यांनी केले.कार्यक्रमाला समता सैनिक दलाचे कमांडो व एस एस डी उपस्थित होते.पवन गेडाम, सूरज लिंगायत, लीना पाटील सरिता बारसागडे यांचे सहकार्य लाभले