*८५ रुग्णांना मिळाली विनामूल्य वैद्यकीय सेवा*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*देचलीपेठा:* दि जोश फाउंडेशन, जिमलगट्टा, जिमलगट्टा ग्रामपंचायत आणि पेठा ग्रामपंचायतच्या सहकार्याने ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पेठा ग्रामपंचायत येथे दोन दिवसीय वैद्यकीय शिबिराचा पहिला दिवस उत्तम प्रकारे पार पडण्यात आले.या शिबिरात एकूण ८५ रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सल्ला, निदान आणि औषधोपचाराचा लाभ देण्यात आले.
या शिबिरात डॉ. संगीता मेडी आणि त्यांच्या संघाने उत्तम कामगिरी करून रुग्णांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पुरवली. शिबिरात सामान्य आरोग्य तपासणी, रक्तदाब, डायबिटीज, हृदयरोग, श्वसनाच्या तक्रारी यासारख्या गंभीर आजारांचे निदान करण्यात आले. तसेच, रुग्णांना त्यांच्या आरोग्यासंबंधीच्या समस्यांवर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
९ फेब्रुवारी २०२५ रोजी जोश चॅरीटेबल हॉस्पिटल, जिमलगट्टा येथे दुसरे वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात अधिकाधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
लोकांनी आपल्या कुटुंबासह या शिबिराचा फायदा घेण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा डॉ, संगीता मेडी यांनी केली आले आहे.
मधुकर कांबळे
दि जोश फाउंडेशन

