मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9429751809.
दिनांक 08/03/2025 रोजी गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपपोस्टे. देचलीपेठा येथे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन महिलांचे सर्वांगीन विकासासाठी, त्यांचे कलागुणांना वाव मिळण्यासाठी व शासकीय योजनेचा लाभ त्यांचेपर्यंत पोहचविण्यासाठी जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन “बेबी मडावी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
महिला मेळाव्याची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाउ, बिरसामुंडा, विर बाबुराव शेडमाके व बाबसाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला दिप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस उपनिरिक्षक दिनेश राउत यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महिला विशेष दिनानिमीत्त एकदिवसीय प्रभारी अधिकारी मपोना./श्रीमती कोडापे मॅडम, उद्घाटक C/09 बटालियनचे INSP सुमीत कुमार यांचेसह प्रमुख पाहुणे म्हणुन पोस्ट ऑफीस येथील महिला स्टॉफ आशावर्कर, अंगणवाडी सेविका, बचत गट प्रमुख आणि शासकीय आश्रम शाळा देचलीपेठा येथील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
प्रभारी अधिकारी संजय तडवी यांनी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच महिलाचे हक्क आणि त्यांचेसाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी यांची माहिती दिली. पोउपनि. पवन बंडे सा. यांनी उपस्थित महिला व विद्यार्थ्यांना Good Touch / Bad Touch बाबत मार्गदर्शन तसेच महिला पोलीसांचे नेहमी मदद व मार्गदर्शन राहील याबाबत आश्वासन दिले.
महिला दिनानिमीत्त पोलीस खात्यातील महिलांच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल आदर म्हणुन उपपोस्टे देचलीपेठा येथे संपुर्ण दिवसाचा चॉर्ज असलेल्या महिला पोलीस नाईक श्रीमती निर्मला कोडापे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच मपोशि. प्रगती रामटेके यांनी सुध्दा महिलांचे समाजातील स्थान आणि त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल माहिती देवून प्रत्येक महिलेने आपापल्या क्षेत्रात अग्रेसर राहण्याचे आव्हाहन केले. तसेच उपपोस्टे हद्दीतील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन मेळाव्यातील उपस्थित गरजु महिला, ग्रामस्थ, विद्यार्थी यांना आवश्यक साहीत्याचे वाटप करण्यात आले.
महिला मेळाव्याकरीता हद्दीतील 350 ते 400 चे संख्येने महिला, पुरुष, विद्यार्थी. उपस्थित होते. मेळाव्याकरीता उपस्थित नागरीकांची अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. तसेच शुर बेबी मडावी यांचे आत्म्यास शांती मिळावी म्हणुन मौन बाळगुन मेळाव्याची सांगता करण्यात आली.

