*पाणी पुरवठा योजनेचा विदयुत Transfarmer उपलब्ध करून देण्याबाबत तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809
ग्रामपंचायत कार्यालय अंकीसा अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा विदयुत Transfarmer जळून गेला आहे. मागील आठ दिवसापासून विदयुत पुरवठा खंडित असल्यामुळे पाणी पुरवठा योजना बंद असून नागरिकाना पाणी टंचाई भासत असून नागरिकांना त्रास होत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकाना पाणीपुरवठा करणे गरजेचे असून लवकरात – लवकर सदर पाणी पुरवठा योजनेचा विदयुत Transfarmer उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीचे निवेदन गोंडवांना विद्यापीठाच्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांना ग्रामपंचायत कार्यालय अंकीसाच्या वतीने देण्यात आले आहे. सदर समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात तात्काळ विद्युत ट्रांसफार्मर बसवण्याचा निर्देश संबंधित विद्युत विभागाला तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले आहे.

