मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
एटापल्ली – गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथील बि ए,बि एस्सी प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांतर्फे बि ए,बि एस्सी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील प्राचार्य डॉ एस एन बुटे तसेच प्रमुख अतिथी म्हणून भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळा तथा कनिष्ठ कला महाविद्यालय एटापल्ली चे प्राचार्य श्री पोटदुखे सर, प्रा. डाॅ. बाळकृष्ण कोंगरे, प्रा डॉ संदीप मैंद, प्रा. डाॅ. विनोद पत्तीवार, प्रा. डाॅ. विश्वनाथ दरेकार, प्रा. निलेश दुर्गे, प्रा. डाॅ. शरदकुमार पाटील प्रा. डाॅ. राजीव डांगे, प्रा. डॉ श्रुती गुबावार,, प्रा. अतुल बारसागडे,प्रा भारत सोनकांबळे, प्रा चीन्ना पुंगाटी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
याप्रसंगी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तथा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बि ए. तथा बि एस्सी. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना गिफ्ट देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा. राहुल ढबाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषीत लेकामी व सानिया हिचामी यांनी केले तर आभार प्रदर्शन रंभा पवार हिने केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

