राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष नागेश मडावी यांची तीव्र मागणी.
*आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांची भेट घेतले*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*अहेरी*:- एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूलच्या वसतिगृह अधिक्षक ईश्वर शेवाळे यांनी विद्यार्थांना अमानुषपणे मारहाण केल्याने व मानसिक छळ करीत असल्याने शेवाळे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची तीव्र व एकमुखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष नागेश मडावी यांनी केले आहे.
नागेश मडावी हे गुरुवार 27 मार्च रोजी प्रत्यक्षात मानवाधिकार संघटनेची टीम शाळेत भेट देउन विद्यार्थ्यांची सत्यता व आपबिती जाणून घेतली असला विद्यार्थी म्हणाले की अधीक्षक रोज रात्रौला विनाकारण मारत होते. विद्यार्थी नववी वर्ग वा 10 वी वर्गाच्याच विद्यार्थीयांना काडीने वा चपली ने सुद्धा मारत होता मुलांच्या मांडीवर अजूनही जखमा दिसत आहे. हे सर्व प्रकरण मागील अनेक महिण्यापासून सुरु असतांना सुद्धा प्रेन्शिपाल ला माहित नाही हे मात्र नवलंच ही चर्चा अहेरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी खुशल जैन यांची भेट घेतले आणि वसतिगृह अधिक्षक ईश्वर शेवाळे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी तालुकाध्यक्ष तथा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष नागेश मडावी. राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली. जिल्हा सचिव रतन दुर्गे. तालुका शह सचिव सुरेश दुर्गे.तालुका उपाध्यक्ष मधुकर गोंगले, यांनी केले आहे.
प्रकल्प अधिकाऱ्यांना भेट दिली असता म्हणाले की विद्यार्थीयांची मेडिकल करून पुढील कार्यवाही करण्यात येयेल असे आस्वासन दिले.
वसतिगृहात चा. सी सी टीव्ही कॅमेरे दीड वर्षापासुन बंद आहे. अनेक पंखे. व लाईट बंद पडलेले आहे. ही कल्पना प्रिन्सिपल ला कसे काय माहित नाही हे मात्र नवलवाटत आहे.

