महावितरण कंपनीचे दुर्लक्ष, नागरीक संतापले
माजी सभापती श्री भास्कर तलांडे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यलयाला देणार धडक.
अहेरी तालुक्यात सद्यातरी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणमुळे मागील अनेक दिवसापासून शहर तसेच ग्रामीण क्षेत्रातही कमी विद्युत दाबामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे . यामुळे नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे.
कमी दाबाचा विद्युत पुरवठा केला जात असल्याने कामांचा खेळखंडोबा होत आहे. कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरीक, लघु उद्योजक, ग्रामीण कारागीर यांच्या व्यवसायावर विपरीत परीणाम होत आहे. कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या आहेत. याबाबत विद्युत विभागाने लक्ष घालून त्वरित यासंदर्भात काही मार्ग काढावा अशी मागणी केली जात आहे.
ऐन उन्हाळ्यात वारंवार वीज पुरवठा कधी-कमीतर कधी अधिक विद्युत दाबाने अहेरी तालुक्यातील कमलापुर, राजाराम, खांदला, तिमरम ग्रामपंचायत अंतर्गत रायगट्टा, गोलाकर्जी, चिरेपली, पतिगाव, कोत्तागुडम, मरणेली, गुड्डीगुडम, छल्लेवाडा, आदी गावात ही समस्या सातत्याने उद्भवत आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.ग्रामीण क्षेत्रातही विद्युत प्रवाह कमी दाबाने होत असल्याचे घरातील वस्तू सह राईस मिल,झेरॉक्स मशीन, कॉम्प्युटर, पेंटिंग मशीन यासह अनेक मशिनरी बंद पडत असल्याने अनेक कामानिमित्त ग्रामीण क्षेत्रातून येणाऱ्या नागरिकांना कामाविना परतावे लागत आहे.त्यासोबतच या उन्हाळ्याच्या दिवसांत गारवा मिळण्यासाठी घरातील फ्रिज, ए सी, कुलर, फॅन, टीव्ही या उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. या उपकरणांना विज अधिक लागते. मात्र मागील अनेक दिवसांपासून दिवसा व रात्री कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने याचा परिणाम या महागड्या उपकरणावर होत आहे.
अनेकवेळा चालू उपकरणे कमी दाबाने वीजपुरवठा झाल्याने बंद पडतात तसेच वारंवार हा प्रकार होत असल्याने उपकरणात तांत्रिक बिघाड होत आहे, यामुळे नागरिकांना या सुविधेचा उपयोगच करता येत नाही. शिवाय दुरुस्तीचा खर्चही सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घ्यावी, अशी मागणी नागरीकातून केली जात आहे.
कमलापुर येते 33 केव्ही विद्युत सभस्टेशन मंजूर करण्यात यावी म्हणुन कमलापुर, राजाराम, खांदला, तिमरम येतील ग्राम पंचायतनी ठारव घेवून दहा वर्षाआधी मंत्रालयात जावून ऊर्जामंत्री, पालकमंत्री यांना निवेदन दिले होते. व मंजूर हि झाला असे सांगत आहेत,मात्र आज पर्यंत 33 केव्ही सबस्टेशन झाले नसल्याने सदर गावात कमी दाबाच्या वीज पुरवठा होत आहे.या सर्व समस्या लक्ष्यात घेऊन माजी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडी यांनी महावितरण कार्यालयाला भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात येईल. समस्या तात्काळ न सोडवल्यास काही दिवसात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकातून केली आहे.

