चोपडा विश्वास वाडे प्रतिनिधी
येथील शासकीय विश्रामगृहात जळगाव जिल्ह्याचे सहसंयोजक विठ्ठलराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली आम आदमी पक्षाची बैठक उत्साहात संपन्न झाली.
२७ सप्टेंबर रोजी जळगाव येथे जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.सदर मेळावा १०० % यशस्वी झाल्याबद्दल जिल्हा उपसंयोजक विठ्ठलराव साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले .
चोपडा विधानसभा मतदारसंघात ३१९ बूथ केंद्र आहेत. प्रत्येक बूथ केंद्रांवर किमान १० सक्रिय कार्यकर्ते तयार करावेत व वन बूथ – ट्रेन युथ ही संकल्पना लक्षात ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय कार्य करीत राहावे व डिसेंबर अखेर चोपडा तालुक्यांतून किमान ५००० सक्रीय सभासद नोंदणी करावी , येणाऱ्या सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे संघटन वाढवावे अशा प्रकारचे आवाहन जिल्हा उपसंयोजक विठ्ठलराव साळुंखे यांनी बैठकीत केले.
सदर बैठकीसाठी विठ्ठलराव साळुंखे ( जिल्हा सहसंयोजक ) , आर डी पाटील ( तालुका संयोजक ) ,
सुधीर पाटील ( शहर संयोजक ) , समाधान बाविस्कर ( तालुका उप संयोजक ) ,राकेश पाटील ( तालुका सचिव ) , रामचंद्र भालेराव ( शहर सचिव ) , समाधान भालेराव , शैलेंद्र पवार, वेडूराम बारेला , झाऱ्या बारेला यांसह आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकीत विठ्ठलराव साळुंखे, सुधीर पाटील, समाधान बाविस्कर, रामचंद्र भालेराव आदींनी आपले मनोगते व्यक्त केली.
सदर बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर डी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन राकेश पाटील यांनी केले…