अहेरी येथे धमचक्र परिवर्तन दिनानिमित्त भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले. या रॅलीत मोठ्या संख्येने बौद्ध बांधव, सामाजिक कार्यकर्ते, महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
यावेळी *युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम* यांनी स्वतः उपस्थित राहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले व कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली. त्यांच्या उपस्थितीमुळे युवकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
रॅलीदरम्यान “जय भीम”, “बाबासाहेब अमर रहे”, “बौद्ध धम्म चिरंजीव असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. धम्माच्या विचारांचा प्रसार, सामाजिक ऐक्य आणि बंधुता हीच बाबासाहेबांना खरी अभिवादन असल्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.

