पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी पं. स. सभापती श्री. भास्कर तलांडे यांनी केली आहे.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809
*अहेरी ==*
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे धान कापणी येरणीवर येऊन असतानाच अचानक पावसाचा जोर आणि वादळी वाऱ्याचा धुमाकूळ घातल्याने अनेकांचे शेतकऱ्याचे धान अवकाळी पावसामुळे खाली पडले आहेत.
हलके धान दसरा गेल्यावर कापणीला येत असतात मात्र दिवाळी सण सुरु असताना पोळा सणासारखे दिवाळीत पाऊस सुरु असल्यामुळे हलके धान पूर्णपणे शेतकऱ्यांच्या घस्यात आलेले धानाचे अतोनात नुकसान झाले आहे.
तरी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी माजी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांनी पत्रकातून केली आहे.

