हनिशा दुधे. चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9764268694.
बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ. रेणुका सुधाकर दूधे यांच्या प्रचारार्थ आज बल्लारपूर शहरातील साप्ताहिक भाजी बाजार परिसरात पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी मतदार बांधवांना आवाहन करण्यात आले की विकास पुरुष माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष पदासाठी सौ. रेणुका सुधाकर दूधे व बहुमताने भाजपचे सर्व उमेदवार विजयी करावेत.
येणाऱ्या पाच वर्षांत बल्लारपूर शहराला सर्वात सुंदर, स्वच्छ व विकासाभिमुख शहर बनवण्याचा आमचा ठाम संकल्प असून, त्यासाठी नागरिकांनी भाजपला साथ द्यावी अशी विनंती करण्यात आली.
विकासासाठी मतदान करा – भाजपला विजयी करा!
बल्लारपूरचा विकास, भाजपचा विश्वास!
*हरीश ज. शर्मा*
*भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर (ग्रा)*
*माजी नगराध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर*

