अंत्य यात्रेत मोठा जनसमुदाय उपस्थित होते.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गडचिरोली ==
*अहेरी*:- आलापल्ली येथील गणपत तावाडे हे फोन वर बोलत असताना गत 9 डिसेंबर रोजी पाठीमागून प्रवीण ब्रह्मनायक नामक पोलिस शिपायाने दुचाकीने धडक दिले. (Mh 33 Af 9675) गणपत तावाडे यांच्या डोक्याला जबर मार लागले. आधी चंद्रपूर व नंतर नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले. उपचारा दरम्यान 18 डिसेंबर गुरुवार रोजी नागपूर येथील इस्पितळात गणपत तावाडे यांचे निधन झाले.
19 डिसेंबर शुक्रवार रोजी वेलगुर रोडवरील स्मशान घाटात बौद्ध रितीरिवाज व संस्कृतीनुसार अंतिम संस्कार करण्यात आले. अंत्य यात्रेत फार मोठा जनसमुदाय उपस्थित होते. “अमर रहे..,अमर रहे गणपत तावाडे अमर रहे” असे जयघोषणा देण्यात आले.
गणपत तावाडे हे सदैव सामाजिक कार्यात सक्रीय असायचे त्यामुळे त्यांची फार मोठी लोकप्रियता होती, त्यांच्या निधनाने सामाजिक हानी झाली असून अहेरी उपविभागात हळहळ व्यक्त केले जात आहे. अंत्य यात्रेत सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर, समाज बांधव, मित्र परिवार व चाहते बहुसंख्येने उपस्थित होते. शोकसभेत विविध मान्यवरांनी गणपत तावाडे यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकून श्रद्धांजली अर्पित केले. गणपत तावाडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी , सुन असा आप्तपरिवार आहे.

