मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम येतील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील अनेक वर्षीपासून कित्येकदा निवेदन देऊनही ग्रामपंचायत पदअधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत की, असा सवाल शाळा व्यवस्थापक समिती व पालकवर्गातून प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा परिषद केंद्र शाळा राजाराम येथे एक ते सातवी पर्यंत वर्ग असून एकूण विद्यार्थी संख्या १६५असून वर्ग खोली अपुरी पडत असून विध्यार्थी बसण्याकरीता खूप अडचण होत आहे. वर्गखोली नव्याने बांधकाम करण्यात यावी.
शाळेतील अवती,भोवती संरक्षण भिंत अर्धवट असल्याने पूर्ण करण्यात यावी.
वृक्षरोपण, परसबाग ई उपक्रम राबविणे व शाळेचा अवती भोवती गुरांचा संचार होत असल्यामुळे मोठी अडचण निर्माण होत असल्यामुळे या करीता संरक्षण भिंत करून देण्यात यावे.
त्याच प्रमाणे मुलांना खाली बसण्याकरीता आसनपट्टी फक्त १५नग उपलब्ध करून देण्यात यावी.
डांबेलस २०नग, बँड१नग,स्टील खुर्ची २नग,लेझिम २०नग,कॅसिओ १नग,मोठे टेबल २नग,१मॅट ३०×३०चे हिरवा मॅट,२नग,तसेच शाळेचा अगदी जवळ असलेले चिंचाचा झाड असून त्या झाडाजवळ मोठमोठे फांदी लागून असल्यामुळे जणीत्र स्पर्श होत आहे, भविष्यात जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता विविध समस्या घेऊन शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार, उपाध्यक्ष मनोज सिडाम, शाळेचे मुख्याध्यापक अजय पस्पूनूवार,माजी पं. स. सभापती भास्कर तलांडे,ग्रामसेवक करशी उपस्थित होते.

