मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
आगामी संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी आणि बूथ स्तरावर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीत मारकबोडी गावात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी त्यांनी बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक बूथ स्तरावर कार्यकर्त्यांनी सक्रिय होऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन रेखाताई डोळस यांनी केले.
शक्ती केंद्र प्रमुखांनी आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बूथ प्रमुखांशी समन्वय साधून पक्ष संघटन अधिक गतीमान करावे, यावर बैठकीत भर देण्यात आला.
आगामी काळात महिला आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार असून, जास्तीत जास्त महिलांना पक्षाच्या प्रवाहात सामील करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीला मारकबोडी गावातील भाजपचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

