डॉ. प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
दिनांक 3 फेब्रुवारी 2026 चामोर्शी तालुक्यातील
गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समिती चामोर्शी येथील प्रशासकीय इमारत अतिशय जीर्ण पूर्णपणे मोडकडीस आलेला आहे.सदर इमारत निर्लेखन करून त्या ठिकाणी नवीन पंचायत समिती प्रशासकीय इमारत बांधकाम करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली पंचायत समिती चामोर्शी हि गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा व सर्वाधिक ग्राम पंचायत असलेला तथा जिल्ह्यातील मोठा व्यापारीपेठ तालुका आहे. अनेक वर्षापासून सदर प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आहे सदर इमारत आता मोडकडीस असलेली व अतिशय जीर्ण झालेल्या अवस्थ्येत आहे. पावसळ्यात त्या इमारती मधील स्लाप पाझर होऊन वरून पाणी खाली गळते. व खाली पाणी साचून राहते. पावसळ्यात बाहेरगाव येथून येणारे नागरिकांना तसेच कर्मचाऱ्याना पंचायत समिती कार्यालयीन कामकाजासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. त्याकरिता
सदर पंचायत समिती सदर इमारत निर्लेखन करून त्या ठिकाणी नवीन पंचायत समिती प्रशासकीय इमारत बांधकाम करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. खुणे यांनी पंचायत समिती चामोर्शी येथे
आपल्या अचानक भेटी दरम्यान केली. सदर मागणी संघटनेच्या निवेदनाद्वारे खासदार लोकसभा क्षेत्र चिमूर-गडचिरोली,आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र,
मा.जिल्हाधिकारी गडचिरोली
मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली. यांना सुद्धा करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे अल्पसंख्याक आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्ष जावेद भाई सय्यद, संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी माजी सरपंच रमेश लेकलवार, व मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

