कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते भोलूभाऊ सोमनानी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
आरमोरी :- आरमोरी तालुक्यातील मौजा जोगीसाखरा येथे आयोजित भव्यदिव्य डान्स स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या थाटात, जल्लोषात आणि प्रचंड उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते भोलुभाऊ सोमनानी होते, तर उद्घाटन माजी आमदार आनंद गेडाम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या रंगतदार कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी मंचाची शोभा वाढवली. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वास भोवते, आरमोरी नगर परिषदेचे नगरसेवक भारत बवनथडे, अरुण हर्षे, बंटी खडसे, रामदास डोंगरवार यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक संदीप ठाकूर, सरपंच तथा शिवसेना जिल्हा प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
डान्स स्पर्धेदरम्यान तरुणाईचा उत्साह, प्रेक्षकांचा जल्लोष आणि टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील कलागुणांना व्यासपीठ मिळते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आयोजनाचे कौतुक केले.

